विंदा, बहिणाबाईंची चरित्रे प्रकाशनाच्या वाटेवर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

मुंबई - साहित्य अकादमीच्या वतीने ज्ञानपीठविजेते कवी विंदा करंदीकर, कवयित्री बहिणाबाई चौधरी आणि कवी अरुण कोलटकर यांची संक्षिप्त चरित्रे (मोनोग्राफ) लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहेत. महान व्यक्तिमत्त्वांबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता अनेकांना असते; परंतु जाडजूड ग्रंथ वाचण्यासाठी वाचकांकडे वेळ नसल्याने समाजसुधारक, स्वातंत्र्यसेनानी, साहित्यिक, राजकीय नेते यांच्या व्यक्तित्वाची आणि कर्तृत्वाची अभ्यासपूर्ण ओळख करून देणारी त्यांची संक्षिप्त चरित्रे (मोनोग्राफ) साहित्य अकादमीच्या वतीने प्रकाशित करण्यात येतात.

साहित्य अकादमी 24 भाषांमध्ये संक्षिप्त चरित्रे प्रकाशित करते. विंदांचे संक्षिप्त चरित्र वसंत पाटणकर, बहिणाबाईंचे प्रकाश सपकाळे आणि अरुण कोलटकर यांचे संक्षिप्त चरित्र नितीन रिंढे संपादित करत आहेत. दुर्गा भागवत, विभावरी शिरूरकर यांच्या संक्षिप्त चरित्रांच्या आवृत्त्या काही महिन्यांतच संपल्याने त्यांना प्रचंड मागणी असल्याने ती पुनर्प्रकाशित करण्यात येणार आहेत.

Web Title: mumbai news vinda bahinabai petitions on the Path of publications