जीवघेणा खांब रेल्वेने हटवला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

विरार - नालासोपारा आणि वसई स्थानकांदरम्यान रेल्वेमार्गालगतचा जीवघेणा खांब अखेर प्रशासनाने हटवला. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

नालासोपारा आणि वसई स्थानकांदरम्यान रेल्वेने ओव्हरहेड वायरसाठी एक खांब उभारला होता. रुळांच्या अगदी लगत असलेल्या या खांबावर आदळल्याने वर्षभरात आठ प्रवाशांचा बळी गेला आणि अनेक जण जखमी झाले. हा जीवघेणा खांब हटवण्याची मागणी प्रवाशांनी केली होती. त्याबाबत युवासेनेचे प्रतीक सुतार आणि रविकांत नागरे यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे तक्रार केली होती. हा खांब रेल्वे प्रशासनाने हटवून रुळांपासून सुरक्षित अंतरावर दुसरा खांब उभारला आहे. 

या स्थानकांतून दररोज हजारो नागरिक प्रवास करतात. त्यामुळे लोकलमध्ये प्रचंड गर्दी होत असल्याने अनेक प्रवाशांना दरवाजात उभे राहावे लागते. या प्रवासात लोकलच्या दारात उभे राहिलेले अनेक प्रवासी त्या खांबावर आदळून खाली पडले होते. रात्रीच्या वेळी अशा अपघातांचे प्रमाण जास्त होते. गेल्याच महिन्यात दोन दिवसांत दोन अपघात झाले होते. हा खांब रेल्वे प्रशासनाने हटवल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: mumbai news virar railway