पुरेशा पाणीसाठ्याची मुंबई महापालिकेची तयारी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

मुंबई - मुंबईत मागणीनुसार अजूनही पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे पाणीपुरवठा प्रकल्प वेगाने मार्गी लावण्याची महापालिकेच्या जल अभियंता खात्याची धडपड सुरू आहे. मुंबईला २०४१ पर्यंत पुरेसा ठरेल इतका साठा उपलब्ध केला जाईल, अशी ग्वाही जल अभियंता अशोक तवाडिया यांनी दिली.

मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांचा पाहणी दौरा पालिकेने आयोजित केला होता. या वेळी जल अभियंता तवाडिया पत्रकारांशी बोलत होते. मुंबईला दररोज ४५०० दशलक्ष लिटर पाण्याची आवश्‍यकता असते. त्यापैकी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांतून ३९०० दशलक्ष लिटर पाणी रोज पुरवले जाते. यापैकी १५० दशलक्ष लिटर पाणी ठाणे, भिवंडी आणि निजामपूरला दिले जात असून, उरलेले ३७५० दशलक्ष लिटर पाणी मुंबईला पाठवले जाते. मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येला हे पाणी अपुरे पडत आहे. पाण्याची समस्या दूर करण्यासाठी दमणगंगा पिंजाळ नदीजोड प्रकल्प, गारगाई हे प्रकल्प पालिकेने प्राधान्याने हाती घेतले आहेत. या पाणीपुरवठा प्रकल्पाला केंद्र सरकारच्या ९० टक्के परवानग्या मिळाल्या असल्याची माहिती तवाडिया यानी दिली.

पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी सात धरणांव्यतिरिक्त आणखी तीन धरणे बांधली जाणार आहेत. गारगाई धरणातून ४४० दशलक्ष लिटर, दमणगंगा धरणातून १८६५ दशलक्ष लिटर, पिंजाळ धरणातून १८६५ दशलक्ष लिटर असा एकूण ३१७० दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा होणार असल्याचे तवाडिया यांनी सांगितले. गारगाई प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू असून, हा प्रकल्प चार वर्षांत तर दमणगंगा व पिंजाळ हे प्रकल्प सात वर्षांत मार्गी लागतील, अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: mumbai news water