पाणी, पर्यावरण प्रश्‍नाचा वेध

पाणी, पर्यावरण प्रश्‍नाचा वेध

मुंबई - भायखळ्यातील जिजामाता उद्यानातील  भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाच्या नूतनीकरणाला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने भारतातील १० कलाकारांच्या वैविध्यपूर्ण कलाकृतींच्या कलाविष्काराचे प्रदर्शन पाहण्याची मुंबईकरांना संधी मिळाली आहे. तंत्रज्ञानाच्या साह्याने पर्यावरणाचा ऱ्हास केल्याने निर्माण झालेल्या पाणीप्रश्‍नापासून मानवी संबंध व पर्यावरणापर्यंतच्या अनेक समस्यांचा वेध या प्रदर्शनात घेतला आहे. हे प्रदर्शन २७ मार्चपर्यंत खुले असणार आहे. यानिमित्ताने परिसंवादही घेण्यात येत आहेत. 

भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयाच्या तळमजल्यावर  १८७६-७७ दरम्यान सापडलेल्या देवमाशाचा सांगाडा जतन केला हाेता; मात्र त्यानंतर तो नष्ट झाला. त्या सांगड्याचे स्वरूप असलेला जितीश कल्लाट यांनी तयार केलेला अक्राळविक्राळ टॅंकर भविष्यातील पाणीसंकटाचा प्रश्‍न उपस्थित करतो.एकेकाळी कापड उत्पादनाचे महत्त्वाचे शहर असलेल्या मुंबईत आज जागेसाठी इंचा-इंचाची लढाई पाहायला मिळत आहे, हे अत्यंत वेगळ्या पद्धतीने कापडाचा वापर करून मनीष नाई यांनी मांडले आहे. आज भाषिक अस्मिता मोठ्या असल्या, तरीही शब्दांच्या पलीकडची माणसांना एकमेकांशी जोडणारी अशी भाषा अस्तित्वात आहे, याचे चालते-बोलते उदाहरण डॉक्‍युमेंटेशनच्या माध्यमातून मिथू सेन यांनी दाखवले आहे. 

२० वर्षे पाणीप्रश्‍नावर काम करणारे कलावंत अतुल भल्ला यांनी नदीच्या बेकायदा उपशाच्या चित्राद्वारे प्रतीकात्मकरीत्या निसर्गावरील अतिक्रमणांचा प्रश्‍न उपस्थित केला आहे. हल्ली निसर्गावर मात करून बोन्साय असो किंवा क्रोसब्रिडिंग असो अशा विविध गोष्टींना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जन्म दिला आहे; मात्र निसर्गचक्रच बदलल्यामुळे होणारे विपरीत परिणामांचे दर्शन रिना कल्लाट यांच्या कलाकृतीतून होते.

मानवी अपप्रवृत्तीवर प्रकाश
आजच्या परिस्थितीत मूळ मानवी प्रवृत्तीला सोडून अनेक अपप्रवृत्ती मानवाकडे दिसून येतात, हे प्रोजेक्‍टरवरची एक रेषा तुमच्या सावलीचा पाठलाग करते आणि वेगवेगळ्या आकाराचे भाग त्या सावलीला येऊन चिकटतात, यातून शिल्पा गुप्ता या कलाकाराने दाखवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com