विनाहेल्मेट प्रवास धोक्‍याचा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

मुंबईत चार महिन्यांत 42 दुचाकीस्वार, सहप्रवाशांचा मृत्यू
मुंबई - विनाहेल्मेट प्रवास करणे अनेकांच्या जिवावर बेतत आहे. या वर्षी जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत मुंबईत झालेल्या विविध अपघातांत हेल्मेट न घालणाऱ्या 42 दुचाकीस्वार आणि सहप्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातांत दोनशेहून अधिक जखमी झाले आहेत.

राज्याच्या परिवहन विभागाने जानेवारी 2016 पासून दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती केली आहे. त्याबाबत जागृती करण्यासाठी वाहतूक पोलिस वेळोवेळी मोहीम राबवतात. त्यानंतरही अनेक जण हेल्मेटशिवाय प्रवास करतात. या पार्श्‍वभूमीवर परिवहन विभागाने गेल्या वर्षी एक ऑगस्टपासून "नो हेल्मेट- नो पेट्रोल' या नियमाची अंमलबजावणी करण्यास सुरवात केली. त्यास पेट्रोलपंप चालक- मालकांनी विरोध केल्यानंतर वाहतूक पोलिसांनी मुंबईतील पेट्रोल पंपांवर येणाऱ्या दुचाकीस्वारांची नोंद करण्यास सुरवात केली होती.

सर्वाधिक अपघात - कुलाबा, भायखळा, कांदिवली, बोरिवली, वांद्रे, शीव, मालाड, अंधेरी.

2016 मध्ये 140 दुचाकीस्वारांचा अपघाती मृत्यू झाला, तर 809 जण गंभीर जखमी झाले होते.

2017 मधील अपघात
अपघात मृत्यू गंभीर किरकोळ

दुचाकीस्वार 29 149 48
सहप्रवासी 13 56 26

Web Title: mumbai news without helmet journey dangerous