अमली पदार्थांसह महिलेला अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

मुंबई - अमली पदार्थ तस्करीप्रकणी एका महिला तस्कराला मानखुर्द येथून अटक करण्यात आली आहे. अमिना हमजा शेख ऊर्फ लाली (वय 49) असे तिचे नाव आहे. तिच्यावर यापूर्वीही घाटकोपर आणि वरळी युनिटमध्ये अमली पदार्थ तस्करीप्रकरणी गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी दिली. मानुखर्द येथील भारतीय इंदिरा एकता सोसायटीत राहत असलेली अमिना अमली पदार्थ तस्करी करत असल्याची महिती वरळी युनिटला मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी सापळा रचून अमिनाला अटक केली. तिच्या घराची झडती घेतली असता, तिच्याजवळ 25 ग्रॅम हेरॉइन मिळाले.
Web Title: mumbai news women arrested drugs

टॅग्स