महिलांच्या कायद्याचे अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

मुंबई - महिलांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सरकार या संदर्भात विचार करत असल्याची माहिती महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

मुंबई - महिलांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सरकार या संदर्भात विचार करत असल्याची माहिती महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

घरातून पळून जाणाऱ्या मुलांना पुन्हा त्यांच्या घरी पाठवण्यासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना सरकार पाठबळ देईल; तसेच महिलांविषयीच्या कायद्याची माहिती देण्यासाठी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा सरकार विचार करत आहे, असे मुंडे यांनी सांगितले. त्यासाठी सर्व स्वयंसेवी संस्थांची कार्यशाळा लवकरच घेण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.

Web Title: mumbai news women law training to officer