तापीद्वारे मेट्रो-3 भुयारीकरणाचा 36 वा टप्पा पूर्ण; पॅकेज-6 चे 100 % भुयारीकरण पूर्ण

तापीद्वारे मेट्रो-3 भुयारीकरणाचा 36 वा टप्पा पूर्ण; पॅकेज-6 चे 100 % भुयारीकरण पूर्ण

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे शुक्रवारी (ता.12) रोजी सहार रोड ते आंतरदेशीय विमानतळ स्थानक या दरम्यानचा 1.5  किमी इतका लांबीचा 36 वा भुयारीकरणाचा टप्पा पूर्ण करण्यात आला. तापी-1 आणि तापी-2 या दोन टनेल बोअरिंग मशिन्स (टीबीएम) च्या मदतीने पॅकेज-6 ने एकूण 4.4  किमीचे भुयारीकरण पूर्ण केले आहे.

मेट्रो-3 प्रकल्पाचे एकूण 50.3 किमी 93% भुयारीकरण पूर्ण झाले आहे, अशी माहिती मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली. पॅकेज-6 अंतर्गत आंतरदेशीय विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सहार रोड मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. या पॅकेजमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ ते सहार रोड (अपलाईन - 687 मी. आणि डाउनलाईन - 692 मी.), सहार रोड ते आंतरदेशीय विमानतळ अपलाईन - 1515 मीटर आणि डाउनलाईन - 1512 मीटर) या चार भुयारीकरणाचे टप्पे पूर्ण झाले आहेत. पॅकेज-6 ने एकूण 4.4  किमीचे भुयारीकरण पूर्ण केले. यावेळी कोची मेट्रो रेलचे व्यवस्थापकीय संचालक अल्केश शर्मा यांची उपस्थिती होती. 

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल म्हणालेत, "पॅकेज-6 मधील भुयारीकरण 100% पूर्ण करून मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या पॅकेजमधील दोन स्थानके आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनलवर आहेत. या दोन्ही स्थानकांना एअरपोर्ट टर्मिनलशी जोडले जाईल. त्यामुळे विमानतळापर्यंत प्रवास करणे प्रवाशांना अधिक सोयीस्कर होणार आहे."

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे संचालक (प्रकल्प) एस. के. गुप्ता म्हणालेत, "हार्ड रॉक तंत्रज्ञानाने सुसज्ज टेराटॅक निर्मित टीबीएम तापी -1 आणि तापी 2 द्वारे 15 महिन्यात भुयारीकरण पूर्ण करण्यात  आले आहे. आंतरदेशीय विमानतळ स्थानकाचे जवळपास 76.4 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे." 

mumbai news work of package 6 mumbai metro three underground tunnel 36th phase completed


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com