हुक्का पार्लरमधील वादातून तरुणाची हत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

मुंबई - गोरेगाव येथील हुक्का पार्लरमध्ये दोन गटांत झालेल्या वादातून रविवारी (ता. 22) 26 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली.

मुंबई - गोरेगाव येथील हुक्का पार्लरमध्ये दोन गटांत झालेल्या वादातून रविवारी (ता. 22) 26 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली.

मयूर पांचाळ (रा. शंकरवाडी, जोगेश्‍वरी, मुंबई) असे मृत तरुणाचे नाव आहे. मित्राच्या वाढदिवसासाठी मयूर मित्रांसोबत एसव्ही रोड येथील एका मॉलमध्ये गेला होता. त्याच वेळी दुसऱ्या गटातील तरुणांशी त्यांचा वाद झाला. पार्लरमधून बाहेर आल्यानंतर वाद एवढा वाढला की दोन्ही गटांत हाणामारी झाली. त्यातून मयूरला धारदार शस्त्राने भोसकण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली. जखमी मयूरला मित्रांनी रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्‍टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.

Web Title: mumbai news youth murder