भाड्याच्या मालमत्तेवर 73 टक्के टॅक्स, 'इथे' लादण्यात येतो देशातील सर्वात महागडा टॅक्‍स

भाड्याच्या मालमत्तेवर 73 टक्के टॅक्स, 'इथे' लादण्यात येतो देशातील सर्वात महागडा टॅक्‍स

मुंबई : उल्हासनगर पालिका हद्दीत भाड्याच्या मालमत्तेवर 73 टक्के एवढा महागडा कर लादण्यात येत आहे. त्यामुळे या शहरात मोठमोठ्या कंपन्या तसेच, शोरूम येण्यास धजावत नसून बऱ्याच कंपन्यांनी बस्तान गुंडाळल्याचा आरोप रोहित साळवे यांनी पालिका आयुक्त डॉ.राजा दयानिधी यांना प्रत्यक्षभेटीत दिलेल्या निवेदनात केला आहे. 

उल्हासनगर सोडले तर इतर सर्वच ठिकाणी भाड्याच्या मालमत्तेवर केवळ 30 टक्केच टॅक्‍स आकारला जातो. मात्र पालिकेच्या हद्दीत तब्बल 73.5 टक्के टॅक्‍स लादण्यात येत आहे. पालिकेतील ज्या मंडळींना याबाबत माहीत आहे त्या ठराविक मंडळींचे फावत असून वरीष्ठ अधिकारी मात्र अनभिज्ञ असल्याने सावळ्या गोंधळाला खतपाणी मिळत असल्याचा आरोपही रोहित साळवे यांनी केला आहे.

उल्हासनगरला भेट देण्यासाठी आलेल्या कॉर्पोरेट कंपन्यांचीही सर्वाधिक कर नोंद आहे. पालिकेच्या वतीने लादण्यात येणाऱ्या महागड्या टॅक्‍समुळे ज्यांनी शहरातून बस्तान गुंडाळले त्यात बिग बाजार, मॅकडोनाल्ड आणि केएफसी ही उत्तम उदाहरणे आहेत. तसेच बऱ्याच बॅंका, एटीएम आणि कंपन्या शहर सोडण्याच्या मार्गावर आहेत, असेही रोहित साळवे यांनी आयुक्त डॉ.राजा दयानिधी यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

दयानिधी यांनी टॅक्‍स कमी करण्यासाठी सकारात्मक आश्वासन दिले आहे. आश्वासनाची पूर्तता केल्यास आणि 30 टक्के टॅक्‍स आकारल्यास पुन्हा बिग बाजार, मॅक्‍डोनल्स यांच्यामुळे शहराला झळाळी मिळेल असा विश्वास रोहित साळवे यांनी व्यक्त केला आहे. साळवे यांनी भाड्याच्या मालमत्तेवर आकारण्यात येणाऱ्या 73 टक्के टॅक्‍सचा प्रकार समाज माध्यमांवर व्हायरल केला आहे.

ज्यांनी आपली मालमत्ता भाड्याने (दुकाने किंवा घरे) दिली आहेत किंवा भविष्यात मालमत्ता भाड्याने देण्याची योजना करीत आहेत त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन रोहित साळवे यांनी केले आहे.  

mumbai news73 percent tax taken of the rental properties at ulhasnagar

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com