Lockdown: मुंबईत पुन्हा लॉकडाऊन लागणार का? पालिकेनं दिलं उत्तर 

Lockdown: मुंबईत पुन्हा लॉकडाऊन लागणार का? पालिकेनं दिलं उत्तर 

मुंबई: सध्याच्या परिस्थितीत मुंबईत लॉकडाऊनची गरज नाही. मात्र, आठवडाभर परिस्थितीचा अंदाज घेऊन पुढील निर्णय घेण्यात येतील असे महानगर पालिका आयुक्त इक्‍बाल सिंह चहल यांनी स्पष्ट केले. मुंबईत गेल्या आठवड्यापासून कोविडच्या रुग्णवाढीचा वेग वाढला आहे. गेल्या आठवड्यात कोविड काळातील 24 तासातील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे लॉकडाऊन होणार की नाईट कर्फ्यू या भीतीने मुंबईतील नागरिकांना पछाडले आहे. आयुक्तांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सध्याच्या परिस्थितीत मुंबईत लॉकडाऊन लावण्याची गरज नाही, असे आयुक्त चहल यांनी सांगितले.

महानगर पालिका रोजच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आठवडाभराने परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. मुंबईत कोविडचे रुग्णवाढ होऊ लागल्यानंतर आयुक्तांनी गेल्या आठवड्यात प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन लसीकरणाबरोबरच कोविड चाचण्या वाढविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच चाचण्या वाढल्यावर रुग्ण वाढण्याची शक्‍यता लक्षात घेऊन खासगी तसेच सार्वजनिक रुग्णालयांनी तयारी करुन ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

लक्षणे नसलेल्या कोविड बाधितांना गृहविलगीकरणात राहण्याची परवानगी दिली आहे. मात्र आतापर्यंत काही प्रकारात अशा व्यक्ती बिनधास्त सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याचे आढळत आहेत. त्यांच्यावर फौजदारी करावी करण्यात येत असून त्यांची रवानगी पालिकेच्या कोविड केंद्रात केली जाते. अशा गृहविलगीकरणात असणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी संबंधित इमारतीच्या पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. त्याचबरोबर अशा व्यक्तींना महानगर पालिकेच्या वॉर रुम मार्फतही नियमित संपर्क केला जात असून पालिकेचे पथकही प्रत्यक्ष भेटी घेत आहे.

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai No lockdown required at this time bmc will conduct review one week

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com