Mumbai Weather Forecast : मुंबईकरांनो सावधान! आज जास्त उंचीच्या लाटा उसळणार

मुंबईत ४ ते ५ मे या दोन दिवसांच्या कालावधीत समुद्रात भरतीच्या वेळी अधिक उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
mumbai ocean update imd alert for high tide in arabian sea
mumbai ocean update imd alert for high tide in arabian seaSakal

मुंबई : मुंबईत ४ ते ५ मे या दोन दिवसांच्या कालावधीत समुद्रात भरतीच्या वेळी अधिक उंच लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामानशास्र विभाग आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी समुद्रात जाणे टाळावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार समुद्र किनारपट्टी परिसरात तसेच सखल भागांमध्ये या उसळणाऱ्या लाटांचा परिणाम होण्याची शक्यता आहे. यात भरतीच्या कालावधीत समुद्राच्या लाटांच्या उंचीत सरासरी ०.५ मीटर ते १.५ मीटर इतकी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या ३६ तासांच्या कालावधीत सर्वांनी काळजी घ्यावी, तसेच सर्व यंत्रणांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे.

अधिक उंचीच्या लाटा उसळण्याचा हा इशारा लक्षात घेता, महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी महापालिकेच्या सर्व सहायक आयुक्तांना पोलिसांसोबत समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या आहे.

या काळात नागरिकांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः उन्हाळी सुटीच्या निमित्ताने समुद्रकिनाऱ्यांवर वाढणारी पर्यटकांची संख्या लक्षात घेता अतिरिक्त खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. उंच लाटांमुळे किनारपट्टी भागात राहणाऱ्यांनी तसेच मच्छीमार बांधवांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

यंत्रणा सज्ज

संपूर्ण परिस्थितीवर मुंबई महापालिका, अग्निशमन दल, मुंबई पोलिस तसेच इतर यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. तसेच समुद्रकिनारी तैनात असलेले सुरक्षारक्षक, जीवरक्षक तसेच अधिकारी, कर्मचारी आणि सर्व यंत्रणांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनदेखील प्रशासनाने केले आहे.

ही खबरदारी घ्या

- पर्यटक आणि किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांनी दक्ष राहावे.

- भरतीच्या कालावधीत समुद्रात शिरू नये.

- मच्छीमारांनी किनाऱ्यावर सुरक्षित अंतरावर बोटी ठेवा.

- समुद्रात मासेमारी करताना खबरदारी घ्यावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com