मुंबईतील पुलांचे नव्याने स्ट्रक्‍चरल ऑडिट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 एप्रिल 2019

पावसाळ्यात पूल पडण्याचा धोका असल्यामुळे महापालिका सतर्क झाली आहे. मुंबईतील धोकादायक पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट केले जाणार असून, त्यासाठी प्रशासनाने पुन्हा निविदा मागविल्या आहेत. शहर विभागातील 77 पुलांचे नव्याने स्ट्रक्‍चरल ऑडिट केले जाईल. त्यामुळे मुंबईतील धोकादायक पुलांच्या दुरुस्तीचे काम मार्गी लागणार आहे.

मुंबई - पावसाळ्यात पूल पडण्याचा धोका असल्यामुळे महापालिका सतर्क झाली आहे. मुंबईतील धोकादायक पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट केले जाणार असून, त्यासाठी प्रशासनाने पुन्हा निविदा मागविल्या आहेत. शहर विभागातील 77 पुलांचे नव्याने स्ट्रक्‍चरल ऑडिट केले जाईल. त्यामुळे मुंबईतील धोकादायक पुलांच्या दुरुस्तीचे काम मार्गी लागणार आहे.

अनेक पूल जुने झाल्यामुळे मुंबईकरांचा जीव टांगणीला लागला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालय पूल दुर्घटनेत सात जणांचा बळी गेल्यामुळे शहर आणि उपनगरांतील सर्व पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. हिमालय पूल दुर्घटनेनंतर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मुंबई शहरासह पूर्व आणि पश्‍चिम उपनगरांतील सर्व पुलांचे नव्याने स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार उपनगरांतील पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट सुरू करण्यात आले आहे. शहरातील पुलांच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.

Web Title: Mumbai Old Bridge New Structural Audit