हिरे व्यापाऱ्याची कोटींची फसवणूक करणारा अखेर अटकेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

हिरे निर्यात करण्याच्या बहाण्याने 7.33 कोटींचे हिरे घेऊन फसवणूक करणाऱ्या 35 वर्षीय मलबार हिल येथील हिरे व्यापाऱ्याला मुंबईतील बीकेसी पोलिसांनी अटक केली आहे.

Mumbai Crime : हिरे व्यापाऱ्याची कोटींची फसवणूक करणारा अखेर अटकेत

मुंबई - हिरे निर्यात करण्याच्या बहाण्याने 7.33 कोटींचे हिरे घेऊन फसवणूक करणाऱ्या 35 वर्षीय मलबार हिल येथील हिरे व्यापाऱ्याला मुंबईतील बीकेसी पोलिसांनी अटक केली आहे. संजय शहा असे अटक करण्यात आलेल्या हिरे व्यापाऱ्याचे नाव आहे . दुबई स्थित असलेल्या ब्लूड्रॉप डायम्स डीएमसीचे व्यवस्थापक, तक्रारदार यांनी या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल केली होती.

तक्रारीत 2015 मध्ये आरोपी संजय शाह आणि त्याचा मुलगा करण शहा यांची दुबईच्या प्रदर्शनात एका मित्राद्वारे त्याच्याशी ओळख झाली होती. जुलै 2016 मध्ये, करण शहाने तक्रारदार कंपनीच्या बीकेसी येथील भारत डायमंड येथील कार्यालयाशी संपर्क साधून कच्च्या हिऱ्याची ऑर्डर दिली आणि 40 हजार यूएस डॉलर्स म्हणाजे 26 लाख रुपये त्या बदल्यात हस्तांतरित केले. करण शहानी पिडीत हिरे व्यापाऱ्याला सांगितले की ते 120 दिवसांच्या क्रेडिटवर विविध देशांना निर्यातीसाठी हिरे नियमितपणे खरेदी करत आहेत.

सुरुवातीला आरोपी संजय शहांनी विविध ऑर्डर्स दिल्या आणि दोन वर्षांत ब्लूड्रॉप फर्मकडून 8.42 कोटी रुपयांचे कच्चे हिरे खरेदी केले आणि खरेदीबदल्यात केवळ 1.09 कोटी रुपये दिले.उर्वरित रक्कम सुमारे 7.33 कोटी रुपये बाकी होती . जेव्हा ब्लूड्रॉप डायमंड्सच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या शिल्लक रकमेची मागणी केली तेव्हा शहा यांनी कबूल केल्यानुसार ते 120 दिवसांच्या क्रेडिटपूर्वी पैसे देऊ असे खोटे आश्वासन देत राहिले परंतु ते अयशस्वी झाले.

वारंवार पैशाचा तगादा लावला असता त्यांना पैसे मिळाले नाही. बाजारात आणखी काही हिरे व्यापार्यांशि चौकशी केली असता तक्रारदाराला समजले की आरोपी शहा यांनी अशीच काही जणांचं फसवणूक केली आहे. अखेरीस त्यांनी मुंबईच्या बीकेसी पोलीस ठाण्यात संजय शहा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.पोलिसांनी तपास सुरू केला असता आरोपींनी स्थानिक बाजारपेठेत हिरे विकले आणि विक्रीतून मिळालेली रक्कम मिळवली असून, ते वैयक्तिक खात्यात वळवले असल्याचे तपासत माहिती मिळाली. पोलीसांनी संजय शहा यांचं लोकेशन तपासात अखेरीस त्यांना मलबार हील येथून अटक केली.