Mumbai : ऑनलाईन जेवण ऑर्डर करणे पडले महागात...महिलेला ऑनलाईन गंडा...

महिलेने ऑनलाईन जेवण मागविण्यासाठी ऑनलाईन सर्च करता संबंधित कंपनी मिळाली
online Ordering food online
online Ordering food online sakal

मुंबई : मुंबईत 53 वर्षीय महिलेची जेवणाच्या निमित्ताने झालेल्या ऑनलाईन फसवणूक प्रकरणी गांवदेवी पोलिसांनी झारखंडमधून तीन आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी महिलेने 7 जानेवारीला मुंबईतील गांवदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर दोन महिन्यांनी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. महिलेला जेवणाची ऑर्डर देणे चांगलेच महागात पडले होते. या महिलेला सायबर चोरांनी 87 हजार रुपयांना गंडा घातला होता.

महिलेने ऑनलाईन जेवण मागविण्यासाठी ऑनलाईन सर्च करता संबंधित कंपनी मिळाली. तिथे जेवणासाठी ऑर्डर दिल्यावर सायबर ठगांनी पैसे पाठवण्यासाठी एक लिंक दिली होती. पहिल्यांदा महिलेला 5 रूपये दिलेल्या लिंक शी संबंधित खात्यावर हस्तांतरित करण्यास सांगितले. महिलेने लिंकवर क्लिक करताच काही वेळात 87 हजार रूपये तिच्या बँक अकाउंटमधून वजा झाले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर 7 जानेवारीला महिलेने गावदेवी पोलिसात तक्रार दाखल केली होती. गावदेवी पोलिसानी तपास सुरू केला आणि जवळजवळ 3 महिन्यांनी या तीन आरोपींना गांवदेवी पोलिसांनी झारखंडमधून अटक केली. आरोपींवर माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com