Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी मोठी बातमी! पनवेल-वसई थेट लोकलसाठी १२,७१० कोटींचा प्रस्ताव; १७ स्थानके, ६९ किमीचा नवा रेल्वेमार्ग

Panvel Vasai Direct Local Train Corridor Proposal Sent to Centre: कुर्ला-दादरला लोकल बदलण्याचा त्रास कमी होणार? पनवेल-वसई रेल्वे कॉरिडॉरचा प्रस्ताव केंद्राकडे
Panvel Vasai Railway Corridor Proposed Under MUTP 3B With 17 Stations and 28 Km Elevated Track for Mumbai Commuters

Panvel Vasai Railway Corridor Proposed Under MUTP 3B With 17 Stations and 28 Km Elevated Track for Mumbai Commuters

esakal

Updated on: 

-नितीन बिनेकर

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाच्या असलेल्या पनवेल-वसई उपनगरी रेल्वे कॉरिडॉरच्या दिशेने आणखी एक पाऊल पडले आहे. सुमारे ६९.२३ किलोमीटर लांबीच्या या नव्या रेल्वे मार्गिकेसाठी १२ हजार ७१० कोटी ८२ लाख रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाच्या (एमयूटीपी-३ बी) अंतर्गत हा कॉरिडॉर उभारण्याचे नियोजन आहे. या मार्गावर १७ स्थानके असणार असून, महामार्ग आणि खाड्यांमुळे निर्माण होणारे अडथळे लक्षात घेऊन सुमारे २८ किलोमीटरचा मार्ग उन्नत स्वरूपात उभारण्यात येणार आहे. दरम्यान, पनवेल-कर्जत उपनगरी रेल्वे कॉरिडॉरचे सुमारे ९९ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे पनवेल परिसरातील रेल्वे जाळ्याचा विस्तार होत असताना आता नव्या मार्गिकेच्या मंजुरीकडे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...