
रेकॉर्डब्रेक थंडीमुळे मुंबईकर हैराण
मुंबई - रेकॉर्डब्रेक किमान तापमान (Temperature) घसरल्याने श्वासोच्छवासाच्या तक्रारीत 45 टक्के तर विषाणू संसर्गाच्या तक्रारीत 35 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे सार्वजनिक रुग्णालयातील आकडेवारी सांगत आहे. दिवसा तसेच रात्रीच्या किमान आणि कमाल अशा दोन्ही तापमानात वाढ झाल्याने सर्दी-खोकला, डोकेदुखी, संसर्ग आणि श्वसनाच्या तक्रारी (Respiratory Complaints) घेऊन सायन, केईएम, नायर सारख्या पालिका रुग्णालयांच्या (Municipal Hospital) बाह्यरुग्ण कक्षात (ओपीडीत) (OPD) रांगा लागल्या असल्याचे रुग्णालय प्रमुखांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यात विषाणू संसर्गाचे तसेच श्वासोच्छवासाच्या समस्यांचे सुमारे 40 ते 45 टक्के रुग्ण नोंदवले असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. तर विषाणू संसर्ग जसे डोकेदुखी, श्वासोच्छवास आणि घसादुखीच्या तक्रारी दररोज 30 ते 35 रुग्ण टक्के करत असल्याचे सांगण्यात आले. प्रामुख्याने पालिकेच्या केईएम, सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालय, अंधेरी येथील कुपर तर नायर अशा चार प्रमुख पालिका रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभागात विषाणू संसर्गाचे सुमारे 30 ते 35 टक्के रुग्णवाढ झाले असल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा: पोलीसांची सतर्कता आणि माय लेकरांची भेट; वाचा सविस्तर प्रसंग
यावर बोलताना येथील डॉक्टरांनी सांगितले की तापमान आणि हवामानातील चढउतारांमुळे वायरल ताप आणि फ्लू सारखी लक्षणे वाढत आहेत. अशी लक्षणे कोविडची देखील आहेत. मात्र बहुतांश रुग्ण कोविड निगेटिव्ह आहेत. अंगदुखी, ताप, घशाचा संसर्ग आणि सर्दी सारखी लक्षण असून देखील कित्येक रुग्णांची कोविड चाचणी नकारात्मक असते. सध्या खोकला, सर्दी आणि तापाचे रुग्ण जवळपास प्रत्येक घरात आढळत आहेत. तर यावर बोलताना पालिका प्रमुख रुग्णालय संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले की, थंडी वाढल्या पासून हवामानातील बदलामुळे पालिकांच्या बाह्यरुग्ण विभागात भेट देणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यापैकी बहुतेक मुले आणि ज्येष्ठ नागरिक आहेत. यातील अनेकांना विषाणूजन्य ताप, डोकेदुखी, घसादुखीची तक्रार आहे. मात्र, त्यांना आरटीपीसीआर करण्याचे सुचवत असल्याचे डॉ. भारमल यांनी स्पष्ट केले.
Web Title: Mumbai People Annoying By Record Breaking Cold
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..