Mumbai: उच्चभ्रू वसाहतीत 'एमडी'चा कारखाना, मुंबईतून ५० कोटींचा मुद्देमाल जप्त; कारवाईत धक्कादायक वास्तव समोर

Mumbai Crime: मुंबईतील आग्रीपाड्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यावेळी 'एमडी'चा कारखाना पर्दाफाश केला असून ५० कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
mumbai narcotics Seized

mumbai narcotics Seized

ESakal

Updated on

मुंबई : आग्रीपाड्यातील एका उच्चभ्रू वसाहतीतील एका सदनिकेत चक्क एमडी ड्रग्जचे उत्पादन सुरू असल्याची बाब अमली पदार्थविरोधी पथकाने सोमवारी (ता. २५) केलेल्या कारवाईतून उघड झाली. या कारवाईमुळे एमडी हा अत्यंत घातक मात्र सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या रासायनिक अमली पदार्थाचे उत्पादन कोणीही, कोठेही अगदी सहजरीत्या घेऊ शकते, हे धक्कादायक वास्तव समोर आले. या कारवाईत मामुनी सरकार या तरुणीसह शोएब मन्सूरी आणि सूफियान मन्सूरी यांना अटक करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com