मुंबई पोलिसांनी चार पिस्तुलांसह जप्त केली जिवंत काडतुसं; एकाला अटक | Mumbai crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

culprit arrested
मुंबई पोलिसांनी चार पिस्तुलांसह जप्त केली जिवंत काडतुसं; एकाला अटक

मुंबई पोलिसांनी चार पिस्तुलांसह जप्त केली जिवंत काडतुसं; एकाला अटक

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईच्या लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी (Mumbai police) चार देशी पिस्तुलं आणि काही जिवंत काडतुसांसह एका व्यक्तीला अटक (culprit arrested) केली आहे. मुंबईतील पायधुनी परिसरातल्या स.का पाटील उद्यानाजवळ ही व्यक्ती हे पिस्तुल (illegal gun selling) विकण्यासाठी घेऊन आली होती. प्रदीप वासनिक (Pradip wasnik arrested) असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. (Mumbai police arrested culprit pradip wasnik in illegal selling of gun and seized four guns and live bullets)

हेही वाचा: मुंबईत साथीच्या आजारांचा 'ताप';आरोग्य विभागाची वाढतेय डोकेदुखी

लोकमान्य टिळक मार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अरुण जाधव यांना त्यांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स.का पाटील उद्यान परिसरात एक व्यक्ती काही पिस्तुलं विकण्यासाठी घेऊन येणार होता. त्या माहितीवरुन पायधुनी पोलीस स्टेशन आणि लोकमान्य टिळक मार्ग पोलीस स्टेशन यांनी संयुक्तरित्या सापळा रचून कारवाई करण्याचं ठरलं. त़्यानुसार आरोपीला पकडण्यासाठी चार पथकं तयार करण्यात आली.

तयार करण्यात आलेली पथकं ठरलेल्या वेळी स का पाटील उद्यान परिसरात सापळा रचून वाट पाहत उभे राहीले, काही वेळातच एक व्यक्ती संशयासेपदरित्या चालत येताना दिसली, ही व्यक्ती प्रदीप वासनिकच आहे, याची खात्री झाल्यावर एका पथकानं त्याला घेराव घातला, त्यानं तिथुन सुटण्यासाठी बरेच प्रयत्न केले, पोलिसांशी झटापट केली, पण पोलिसांनी त्याला पकडून ठेवलं. त्याची झडती घेतली तेव्हा त्याच्याकडून 5 देशी बनावटीचे लोखंडी पिस्तुलं आणि 10 जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली. या सर्व मुद्देमालाची किंमत जवळपास 1 लाख 26 हजार इतकी आहे. प्रदीप वासनिक यांच्यावर शस्र अधिनियमाच्या कलम 25, 3 आणि माहाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 135, 37(1)(a)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Mumbai Newscrime update
loading image
go to top