मुंबई पोलिस बेस्ट! उच्च न्यायालयाकडून कामगिरीचे कौतुक

सुनिता महामुणकर
Saturday, 31 October 2020

कोव्हिड संसर्ग आणि लॉकडाऊनमध्येही प्रतिकूल परिस्थितीत मुंबई पोलिस खडतर आणि तणावात काम करीत आहेत, असे कौतुक मुंबई उच्च न्यायालयाने केले आहे.

मुंबई : कोव्हिड संसर्ग आणि लॉकडाऊनमध्येही प्रतिकूल परिस्थितीत मुंबई पोलिस खडतर आणि तणावात काम करीत आहेत, असे कौतुक मुंबई उच्च न्यायालयाने केले आहे. पोलिसांच्या या कामाची दखल घेताना मुंबई पोलिस जगात बेस्ट समजले जातात. नागरिकांनीही त्यांना सहकार्य करायला हवे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. 

राज्यपाल विरुद्ध राज्य, पुन्हा वाद पेटण्याची शक्यता; आमदार नियुक्तीसाठी कडक नियम?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह ट्‌विट केल्याच्या आरोपात नवी मुंबईत राहणाऱ्या सुनयना होले यांच्याविरोधात तीन तक्रारी दाखल झाल्या आहेत. सामाजिक द्वेष आणि दोन समुदायांत तेढ निर्माण करणारी ट्‌विट केली, असा आरोप तक्रारीमध्ये केला आहे. या तक्रारींमध्ये अटक होऊ शकते या भीतीने त्यांनी ऍड. अभिनव चंद्रचूड यांच्यामार्फत न्यायालयात याचिका केली आहे. 
याचिकेवर न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी सुनावणी झाली. होले यांना रीतसर समन्स बजावूनही त्या अद्याप बीकेसी सायबर सेलला जबाब नोंदविण्यासाठी हजर झाल्या नाहीत, असे सरकारी वकील जयेश याज्ञिक यांनी खंडपीठाला सांगितले. या वेळी खंडपीठाने मुंबई पोलिसांना नागरिकांनीही सहकार्य करायला हवे, असे सांगितले. 

मुख्यमंत्री काम करत नाही म्हणून सर्वसामान्यांना राज्यपालांकडे जावं लागतं; भाजप नेत्याची टीका

याचिकादाराची प्रकृती ठीक नव्हती म्हणून त्या हजर राहू शकल्या नाहीत. येत्या सोमवारी (ता. 2) त्या पोलिसांपुढे हजर राहतील, अशी हमी चंद्रचूड यांनी दिली. न्यायालयाने याला मंजुरी दिली आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे निर्देश दिले. याचिकेवर पुढील सुनावणी 23 तारखेला होणार आहे. 

Mumbai Police Best Appreciation of performance from the Mumbai High Court

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Police Best Appreciation of performance from the Mumbai High Court