खाकी वर्दीतल्या रक्त दात्याचे होतय कौतुक

दिनेश चिलप मराठे
मंगळवार, 27 मार्च 2018

मुंबई : खाकी वर्दीतील कर्तव्यदक्ष पोलिस गणेश कट्टे यांनी भाजी विक्रेत्या महिलेस केलेल्या रक्तदानामुळे मुंबई पोलिसांची प्रतिमा उजळली आहे. एक सहृदय जनतेचा मित्र अशी पोलिसांची ओळख निर्माण झाल्याची सुखद घटना पवई येथे घडली आहे.

मुंबई : खाकी वर्दीतील कर्तव्यदक्ष पोलिस गणेश कट्टे यांनी भाजी विक्रेत्या महिलेस केलेल्या रक्तदानामुळे मुंबई पोलिसांची प्रतिमा उजळली आहे. एक सहृदय जनतेचा मित्र अशी पोलिसांची ओळख निर्माण झाल्याची सुखद घटना पवई येथे घडली आहे.

या संदर्भात प्राप्त झालेल्या माहिती नुसार, शनिवार 24 मार्च रोजी मुंबई येथील पवई पोलिस ठाण्यात कर्तव्यावर असलेले पोलिस गणेश कट्टे यांना त्यांच्या परिचयाच्या भाजी विक्रेत्या निलेश नागे यांची पत्नी अचानक चक्कर आल्याने जमिनीवर कोसळल्याचे कळाले. त्यांना शेजारच्या भाजी विक्रेत्यानी हिरानंदानी रुग्णालयात दाखल केले असल्याचीही माहिती त्यांनी मिळाली. अशक्तपणामुळे त्यांना तातडीने 'B+ve' (बी पॉजिटीव) रक्ताची आवश्यकता असल्याचे नागेंकडून कट्टे यांनी समजले.

मात्र रुग्णालयातील रक्तपेढीत 'B+ve' रक्तगट उपलब्ध नव्हता. या रक्तगटासाठी नागे यांची शोधाशोध सुरू झाली होती. त्याच दरम्यान, चिंतेत असलेले नागे आयआयटी येथे असलेल्या पवई पोलिस ठाण्याच्या चौकीत गेले. त्याच परिसरात भाजीचा धंदा करत असल्याने नागे हा पोलिस गणेश कट्टे यांच्या परिचयाचा होता. नागे यांचे पाणावलेले डोळे पाहून कट्टे यांनी त्यांची विचापूस केली.

त्यांनी साहेब 'B+ve' रक्ताची गरज आहे, असे म्हणताच कट्टे म्हणाले, काळजी करू नका. माझा रक्तगट 'B+ve' आहे. मी तुमच्या पत्नीला रक्तदान करतो. असे सांगून वरिष्ठांना या संदर्भात कल्पना दिली आणि कट्टे रक्तदान करण्यास रुग्णालयात गेले. 

"खाकीतला रक्तदाता" आपल्या मदतीसाठी देवासारखा धावून आल्याने निलेश नागे व त्याच्या इतर भाजीविक्रेत्या दोस्तांनी गणेश कट्टे यांचे मनापासून आभार मानले. याहून महत्त्वाचे म्हणजे गणेश कट्टे हे दुसऱ्या दिवशी रामनवनीच्या बंदोबस्त कर्तव्यावर होते तर सोमवार, दि.26 मार्च रोजी आझाद मैदान येथे एल्गार मोर्चासाठी बंदोबस्तावर होते. 

रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असे मानले जाते.
"रक्तदान" केल्याने पवई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पोफळे यांनी गणेश कट्टे यांच्या संकट समयी केलेल्या जनसेवेला मनापासून दाद देत त्यांचे कौतुक केले.

Web Title: mumbai police blood donation