esakal | बायजूचे मालक रवींद्रन यांच्याविरोधात FIR
sakal

बोलून बातमी शोधा

रवींद्रन

बायजूचे मालक रवींद्रन यांच्याविरोधात FIR

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: प्रसिद्ध बायजू कंपनीच्या (BYJU) मालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण देण्यासाठी (EDtech) ही कंपनी ओळखली जाते. आपल्या यूपीएससीच्या (UPSC) अभ्यासक्रमात (curriculum) दिशाभूल करणारी माहिती प्रसिद्ध केल्याबद्दल रवींद्रन यांच्याविरोधात हा FIR दाखल झाला आहे.

आयपीसीच्या कलम १२० (ब) गुन्हेगारी कट रचणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६९ (अ) अंतर्गत आरे कॉलनी पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आलाय. एफआयआरमध्ये कंपनीचे मालक रवींद्रन यांचे नाव आहे. क्राईमफोबिया कंपनीने नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारावर हा एफआयआर दाखल झाला आहे. बायजूने त्यांच्या UPSC च्या अभ्यासक्रमात सीबीआय संयुक्त राष्ट्राच्या UNTOC ची नोडल एजन्सी असल्याचे म्हटले आहे. तक्रारदारानुसार, सीबीआयने लिखितमध्ये ते UNTOC ची नोडल एजन्सी नसल्याचे स्पष्ट केले आहे. फ्रीप्रेस जर्नलने याबाबत वृत्त दिलं आहे.

हेही वाचा: मुंबईत 'या' वेळेला जमावबंदी लागू होणार, महापालिकेची माहिती

"बायजूच्या UPSC च्या अभ्यासक्रमात UNTOC बद्दल मला चुकीची माहिती आढळली. त्यानंतर मी ई-मेलच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांना आवश्यक बदल करायला सांगितला. प्रत्युत्तर म्हणून त्यांनी मला सीबीआय नोडल एजन्सी असल्याचे गृहमंत्रालयाचे पत्र पाठवले. पण ते पत्र २०१२ चे होते. त्या उत्तराने माझे समाधान झाले नाही. मी पोलिसात गेलो" असे स्नेहील यांनी सांगितले. ते क्राईमफोबियाचे संस्थापक आहते.

स्नेहील यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१६ मध्ये सीबीआयने UNTOC ची आपण नोडल एजन्सी नसल्याचे लिखितमध्ये स्पष्ट केले होते. त्यानंतर स्नेहील यांनी UNTOC ची अमलबजावणी करत नसल्याबद्दल भारत सरकार आणि ४५ खात्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

"संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत दहशतवाद विरोध हा भारताचा मुख्य अजेंडा आहे आणि दहशतवाद संपवण्यासाठी UNTOC सुद्धा महत्त्वाचा कायदा आहे. UNTOC ची अमलबजावणी होत नसल्याबद्दल क्राइमफोबियाने हा विषय सर्वोच्च न्यायालयात नेला" असे स्नेहील यांनी सांगितले. "सध्या आम्ही यावर कुठलीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. कारण आम्हाला अजून एफआयआरची कॉपी मिळालेली नाही" असे बायजूच्या प्रवक्त्याने सांगितले.

loading image
go to top