तुम्ही पण शेअर ट्रेडिंग करतात ? एका बोगस स्टॉक ट्रेडर कंपनीबाबत महत्त्वाची बातमी

तुम्ही पण शेअर ट्रेडिंग करतात ? एका बोगस स्टॉक ट्रेडर कंपनीबाबत महत्त्वाची बातमी

मुंबई, ता. 26 : बोगस स्टॉक ट्रेडर कंपनीकडून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू इच्छिणाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी मध्य प्रदेशमधील इंदूरहून तिघांना अटक  करण्यात आली आहे. याबाबात मिळालेल्या माहितीनुसार 19 नोव्हेंबर 2020 ते 22 जानेवारी 2021 पर्यंत फिर्यादी आशिष रवींद्र नागपुरे यांना आरोपींनी शेअर मार्केटमध्ये डिमॅट अकाउंट उघडण्यास लावले. त्यानंतर शेअर ट्रेडिंग करण्याकरिता वेगवेगळ्या बँक खात्यात एकूण 17 लाख 85 हजार रुपये ऑनलाईन भरावयास लावून नागपुरे यांची फसवणूक केली.

या प्रकरणाची तक्रार मुंबई पोलिसांच्या दक्षिण विभाग सायबर पोलिसांकडे दाखल करण्यात आली. त्यानुसार सायबर पोलिसांनी फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नोंद करून या प्रकरणाचा तपास सुरू केला.

दक्षिण विभाग सायबर पोलिसांनी गुन्ह्यातील विविध बँक खात्यांची माहिती प्राप्त केली. त्याचबरोबर एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) व नॅशनल स्टॉक इक्सचेन्ज (एन. एस. ई)  या विभागांकडून गुन्ह्याच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण माहिती मिळवली. तसेच या गुन्ह्यांच्या तांत्रिक तपासादरम्यान आरोपी हे इंदूर, मध्य प्रदेश येथे वास्तव्यास असल्याचे आणि तेथून संपूर्ण भारतात बोगस स्टॉक ट्रेडर शेअर मार्केटिंगमध्ये पैसे गुंतवणूक करतो, असे म्हणून लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली.

त्यानुसार, पथकाने इंदौर, मध्य प्रदेश येथे जाऊन आरोपींचा पत्ता शोधला असता तो बोगस असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास करून यातील मुख्य आरोपीसह तिघांना अटक केली. याकामी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संध्याराणी भोसले, तपास अधिकारी पोलिस निरीक्षक  अशोक उगले यांच्या मार्गदशर्नाखाली दक्षिण विभाग सायबर पोलिसांनी अथक मेहनत घेतली. 

mumbai police busted fake stock trading company cartel from madhya pradesh

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com