कोरोनाच्य पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस आयुक्त ऑन फिल्ड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाच्य पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस आयुक्त ऑन फिल्ड

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मुंबईचे पोलिस आयुक्त सोमवारी पहाटेच रस्त्यावर उतरले. त्यांनी अनेक ठिकाणांना भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. 

कोरोनाच्य पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस आयुक्त ऑन फिल्ड

मुंबई, : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मुंबईचे पोलिस आयुक्त सोमवारी पहाटेच रस्त्यावर उतरले. त्यांनी अनेक ठिकाणांना भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. 

मोठी बातमी - महाराष्ट्रात संचारबंदी लागू ; जिल्ह्यांच्या बॉर्डर्स देखील केल्यात सील

पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी सोमवारी पहाटे 5 वाजता मरिन ड्राईव्ह परिसराची पाहणी केली. या वेळी परिमंडळ- 1 चे पोलिस उपायुक्त डॉ. संग्रामसिंग निशाणदार उपस्थित होते. शहरात जमावबंदी असतानाही नागरिक मोठ्या संख्येने गाड्या घेऊन फिरत होते. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्‍यता असल्याने पोलिस आयुक्तांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नाकाबंदी तसेच बंदोबस्तावरील पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. 

मोठी बातमी  कोरोनाच्या मुद्द्यावरून ट्विटरवर रंगला नरेंद्र मोदी विरुद्ध संजय राऊत सामना...

समजावूनही नागरिक ऐकत नसल्यास सुरक्षिततेसाठी कठोर वागा. जमावबंदी आणि "लॉकडाऊन' आदेश धुडकावून लावणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश पोलिस आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे रस्त्यांवर कर्तव्य बजावणारे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 

to tackle situation of corona mumbai police commissioner is on ground zero