कोरोनाला 'फूल' करुयात! मुंबई पोलिस आयुक्तांचं भन्नाट ट्विट व्हायरल

कोरोनाला 'फूल' करुयात! मुंबई पोलिस आयुक्तांचं भन्नाट ट्विट व्हायरल

सध्या महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट आली आहे. पुणे, मुंबई या सारख्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या काळात मास्क वापरणे सक्तीचं करण्यात आलं आहे.  यामध्येच वैद्यकीय आणि पोलिस प्रशासनदेखील नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचं काम करत आहेत. यात मुंबई पोलिस सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना सतर्क करत आहेत. विशेष म्हणजे मुंबई पोलिस कायमच त्यांच्या हटके ट्विटसाठी चर्चेत येत असतात. यावेळीदेखील ते अशाच एका ट्विटमुळे चर्चेत आले आहेत. एप्रिल फूलचं निमित्त साधत मुंबई पोलिस आयुक्तांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांमध्ये जनजागृती केली आहे.

या एप्रिल महिन्यात मास्क लावू यात आणि कोरोनाला फूल करुयात अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.  त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या ट्विटची चर्चा रंगली आहे.

"कोरोनाला 'फूल' करूया- मास्क लावूया! केवळ एप्रिलमध्येच नाही तर आपण कोरोनावर पूर्णपणे मात करत नाही तोपर्यंत मास्क लावणे आवश्यक आहे", असं ट्विट मुंबई पोलिस आयुक्तांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलं आहे.

दरम्यान,  गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आता मास्क लावणे, सॅनिटाइझर वापरणे बंधनकारक करण्यात आलं आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com