
Mumbai Police Constable Ideal performance
ESakal
जयेश शिरसाट
मुंबई : पोलीस दलात सिंघम अशी ओळख असलेल्या शिखरे यांनी आदर्षयुक्त काम केल्याचे समोर आले आहे. शहरात अनेक ठिकाणी आपल्याच नादात भटकणारे वेडसर, मनोरुग्ण दिसून येतात. तर अशा लोकांची काहीजण मदत असल्याचेही दिसून येते. पोलीस हवालदार सुशील कमल अरुण शिखरे (४१) यांनी वांद्रे येथील बँडस्टँडवर अर्धनग्नावस्थेत भटकणाऱ्या एका वेडसर महिलेची लाज राखल्याचे समोर आले आहे. या कृतीमुळे सर्वसामान्यांसमोर एक आदर्श निर्माण झाला आहे.