७ कोटी रुपये किंमतीच्या २ हजाराच्या बनावट नोटा जप्त; मुंबई पोलिसांची कारवाई

७ कोटी रुपये किंमतीच्या २ हजाराच्या बनावट नोटा जप्त; मुंबई पोलिसांची कारवाई
Summary

बनावट नोटा वितरीत करण्याच्या उद्देशाने आलेल्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

मुंबई - बनावट नोटा वितरीत करण्याच्या उद्देशाने आलेल्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. भारतीय चलनाच्या सात कोटी रुपयांच्या बनावट नोटा आणि ७ वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाइल त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय लॅपटॉप आणि काही कागदपत्रांचा समावेश आहे. दहिसर इथे पोलिसांनी ही कारवाई केली असून ७ जणांना अटक केली आहे.

बनावट नोटांचे रॅकेट सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी याची सविस्तर माहिती काढली असता चौघेजण बनावट नोटांच्या विक्रीसाठी येणार असल्याचं समजलं. संशयित वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये २ हजार रुपयांच्या नोटांचे २५ बंडल असल्याचं आढळून आलं. २ हजार रुपयांच्या जवळपास २५ हजार नोटा म्हणजेच पाच कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.

७ कोटी रुपये किंमतीच्या २ हजाराच्या बनावट नोटा जप्त; मुंबई पोलिसांची कारवाई
भिवंडी : कोळशाचा कंटेनर झोपडीवर पलटल्यानं तीन मुलींचा मृत्यू

वाहन चालक परवाना, पॅनकार्ड, आधारकार्ड, निवडणूक आयोगाचं ओळखपत्र जप्त केलं असून त्यांच्याकडे २८ हजार १७० रुपये रोख रक्कमही सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com