तौक्ते चक्रीवादळात वरप्रदा बोट बुडाल्याप्रकरणी गुन्हा दाखल

तौक्ते चक्रीवादळात वरप्रदा बोट बुडाल्याप्रकरणी गुन्हा दाखल ११ जणांच्या मृत्यूप्रकरणी कंपनीसह मालकाविरोधात FIR
Tauktae Cyclone
Tauktae CycloneFile photo

११ जणांच्या मृत्यूप्रकरणी कंपनीसह मालकाविरोधात FIR

मुंबई: काही दिवसांपूर्वी आलेल्या तौक्ते चक्रीवादळात (Cyclone Tauktae) ONGC शी संबंधित एक बार्ज (Barge) बुडाली. त्यातील काहींना वाचवणं शक्य झालं तर काहींना आपले प्राण गमवावे लागले. त्यानंतर त्या बार्जशी संबंधित काहींवर गुन्हा दाखल झाला. त्याच वादळात वरप्रदा नावाची टग बोट (Varaprada Tug Boat) देखील बुडाली होती. या बोटीवरील सुमारे ११ ते १३ जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती देण्यात आली होती. या बोटीच्या मालकासह कंपनीवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Mumbai Police filed an FIR in connection with tug boat Varaprada that sank during cyclone Tauktae)

Tauktae Cyclone
रेल्वे पोलिसाची चपळाई; धावत जाऊन वाचवले वृद्ध प्रवाशाचे प्राण

तौक्ते चक्रीवादळात बुडालेल्या टगवरील वाचलेले सेकंड इंजिनिअर फ्रान्सिस के सायमन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ग्लोरी शिप मॅनेजमेंट प्रा. लि. आणि कंपनीचे मालक राजेंद्र साही यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टगची कोणतीही दुरुस्ती किंवा देखभाल केली नाही, त्यामुळे चक्रीवादळात टग पाण्यात बुडून त्यावरील अकरा क्रू मेंबर मृत्यूमुखी पडले. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी साही यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या पूर्वीच बुडालेल्या बोटीतील चिफ इंजिनिअरच्या तक्रारीनुसार, पहिला गुन्हा यलोगेट पोलिस ठाण्यात दाखल करून पोलिसांचा तपास सुरू होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com