मुंबई पोलिस चांगलेच वैतागले, कारण पोलिसांवर आता या 'नव्या' कामाचा बोजा...

मुंबई पोलिस चांगलेच वैतागले, कारण पोलिसांवर आता या 'नव्या' कामाचा बोजा...

मुंबई, अंधेरी : रेशन कार्ड नसलेल्या परप्रांतीयांची यादी तयार करण्याची नोटिस मुंबई जिल्हा उपनगर कार्यालयातून पोलिस विभागाला आली आहे. आधीच अपुऱ्या मनुष्यबळामुळे आणि वाढत्या कामाच्या बोजामुळे मुंबई पोलिस मेटाकुटीला आलेले आहेत. त्यातच परिमंडळ 11 येथे नोटीस आल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला. 

मुंबईच्या गुन्हेगारांचा मागोवा, त्यांच्या न्यायालयीन प्रक्रियेची जबाबदारी, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी, त्यानंतर महाराष्ट्रातील परप्रांतीयांना त्यांच्या मूळगावी पाठविण्यासाठी त्यांची व्यवस्था करणे अशा कामाचा अतिरिक्त बोजा पोलीस कर्मचारी यांच्यावर पडत आहे. त्यातच परप्रांतीयांना थांबवून त्यांच्या खाण्यापिण्याच्या व्यवस्था, त्यांची यादी, त्याची वर्गवारी पर्यंतच्या कामाला पोलिसांना जुंपपण्यात आले आहे. 

त्यानंतर आता ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही अशा मुंबईत राहणाऱ्या परप्रांतियांची यादी तयार करण्याची नोटिस मुंबई जिल्हा उपनगर कार्यालयातून पोलिसांना पाठविण्यात आली आहे. त्यामुळे पोलिस दलात संतापाची लाट उसळलेली आहे. परप्रांतीयांची यादी तयार केल्यानंतर सरकार कडून दिले जाणारे 5 किलो तांदूळ हे परप्रांतीयांना पोहचविणे सोपे होणार आहे. सध्या अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच अनेक पोलिसांना क्वारंटाईन केले आहे. त्यांमुळे  प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये मनुष्यबळाचा तुटवडा जाणवत आहे. 

पोलिस वैतागले
गेले अडीच महिने लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर बंदोबस्त, नाकाबंदी, गस्त घालून पोलिस कर्मचारी वैतागले आहेत. कायदा व सुव्यवस्थे सोबतच गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याचे काम, बंदोबस्त, नाकाबंदी, गस्त, परप्रांतीयांना आवरणे, त्यांची कागदपत्रे स्वीकारणे, त्यांची जिल्हा निहाय वर्गवारी करणे, त्यानंतर त्यांना गाडीतून गावी रवाना करणे अशी कामे पोलिस करत आहेत. त्यानंतर आता शिधापत्रिका नसलेल्या परप्रांतीयांची यादी करण्याची नोटीस आल्यामुळे पोलिस कर्मचारी संताप व्यक्त करत आहेत.

mumbai police gets gets extra work of keeping record of migrant workers who dont have ration card

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com