एक कोरोनाबाधित रिक्षाचालक, तशीच चालवली १० दिवस रिक्षा, आता नागरिकांची तंतरली.. कुठे घडलाय 'हा' प्रकार...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 30 May 2020

कोरोनामुळे सर्वांमध्येच भीतीचं वातावरण पसरलंय. अशात कुणाला थोडा जरी खोकला किंवा सर्दी ताप असेल तर आपल्याला कोरोना तर नाही ना अशी शंका मनात आल्याशिवाय राहत नाही.

नवी मुंबई : कोरोनामुळे सर्वांमध्येच भीतीचं वातावरण पसरलंय. अशात कुणाला थोडा जरी खोकला किंवा सर्दी ताप असेल तर आपल्याला कोरोना तर नाही ना अशी शंका मनात आल्याशिवाय राहत नाही. अशात नवी मुंबईतील तुर्भ्यात एक धक्कादायक प्रकार घडलाय.

घणसोली येथील 50 वर्षीय रिक्षाचालकाला कोरोना आजाराची लक्षणे दिसत होती. डॉक्टरांनी त्याला कोरोना चाचणी करण्याचा सल्ल्याबरोबरच घरात अलगीकरण करण्यास सांगितले. दहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. आता त्या दहा दिवसांत तो रुग्ण अनेकांच्या संपर्कात आल्याने त्याच्या विभागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मोठी बातमी - लोकल सुरू करण्याबाबत सर्वात मोठं सर्वेक्षण; वाचा काय म्हणताय मुंबईकर..

घणसोलीतील साई सदानंद नगर परिसरातील चाळीमध्ये 50 वर्षीय रिक्षाचालकाला 18 मे रोजी शारीरिक त्रास होत होता. त्यांनी मनपा रुग्णालय गाठले. डॉक्टरांनी त्याच्या आजाराची लक्षणे पाहून त्याला कोरोना चाचणी करण्यास सांगितले आहे. चाचणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला घरातच अलगीकरण करण्यास सांगितले. परंतु त्यांनी ऐकले नाही. येथील नागरिकांनाही माहिती नसल्याने शेजारी नागरिक त्यांना भेटत असल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोठी बातमी - मुंबईत का फोफावतोय कोरोना ? कारण 'याचा' विचार झालाच नाही... 

त्या रुग्णाची 18 मे रोजी कोरोना चाचणी केली होती. त्यानंतर त्याला अलगीकरण केले होते. त्यानंतर 28 में रोजी त्या रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून त्यांची पत्नी, मुलगा या सर्वांना घरातच अलगीकरण करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या पत्नी व मुलाची चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती घणसोली येथील नागरी आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी वैशाली म्हात्रे यांनी सांगितले.

one corona positive auto driver was driving auto for 10 days fear in navi mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one corona positive auto driver was driving auto for 10 days fear in navi mumbai