सर्वात मोठी बातमी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत उभारण्यात येणार मेगालॅब, एका 'इतक्या' चाचण्या

सर्वात मोठी बातमी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत उभारण्यात येणार मेगालॅब, एका  'इतक्या' चाचण्या

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढू लागला आहे. कोरोनाच्या निदानासाठी आयआयटी अल्युमनाय काऊन्सीलतर्फे मुंबईत मेगालॅब उभारण्यात येणार आहे. या लॅबमध्ये दर महिन्याला 1 कोटी चाचण्या केल्या जाणार आहेत. कोरोनासह इतर संसर्गजन्य आजारामुळे संक्रमीत झालेल्या रुग्णांचीही येथे तपासणी करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी मुंबई विद्यापीठाचे सहकार्य लाभणार आहे. या मेगालॅब साठी जागा लवकरच निश्चित होणार आहे.

कोरोना आणि इतर संसर्गजन्य आजारापासून संक्रमीत झालेल्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी मेगालॅब मुंबई ही जगातील एकमेव चाचणी सुविधा म्हणून नावारुपाला येणार आहे. मुंबईत वैद्यक क्षेत्रातील अद्ययावत आणि जागतिक दर्जाच्या आरोग्य विषयक सेवा पुरविण्यासाठी मॅगालॅबच्या स्थापनेसाठी आयआयटी अल्युमनाय काऊन्सीलतर्फे मुंबई विद्यापीठाची निवड करण्यात आली आहे. याअनुषंगाने या मेगालॅब प्रकल्पासाठी मुंबई विद्यापीठातील संशोधक, विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधन पायाभूत सुविधा यादृष्टिकोनातून मुंबई विद्यापीठाची मोठी भूमिका असणार आहे. मुंबई शहरातील संपूर्ण लोकसंख्येची कोरोनासह इतर संसर्ग आजारांची तपासणी करण्याची क्षमता ठेवणारी अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारीत सुविधा असलेली ही मेगालॅब असेल, असे आयआयटी अल्युमनाय काऊन्सीलचे अध्यक्ष रवी शर्मा यांनी सांगितले.

कोरोनासाठी टेस्ट किट्सची कमतरता भासत असल्याने पूल टेस्टिंगसाठीची प्रणाली शोधण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली. त्यातून पुढे आलेल्या उत्तम कल्पनांची निवड केली असून या प्रणाली केंद्र सरकारकडे पाठविण्यात आल्या होत्या. 1 मे रोजी अ‍ल्युमिनाय काउन्सिलने स्वदेशी बनावटीच्या टेस्ट किट्सच्या निर्मितीवर आपले लक्ष केंद्रित केले. काउन्सिलमधल्या अनेक छोट्या गटांनी 100 टक्के स्वदेशी टेस्ट किट्सची निर्मिती केलेली आहे. ही टेस्ट किट्स आता निर्मितीच्या आणि विक्री परवाना मिळवण्याच्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. भारत, चीन, आसीआन, मध्यपूर्व, आफ्रिका आणी लॅटीन अमेरिकेतल्या अनेक विकसनशील देशांची गरज भागेल इतक्या प्रमाणात या किट्सची निर्मिती करण्याची पायाभूत सुविधा भारतात निर्माण करण्याचा काउन्सिलचा प्रयत्न आहे.
मेगालॅब मुंबई या प्रकल्पात कोरोनासह क्षयरोगापासून संसर्ग होणाऱ्या रुग्णांच्या सुमारे 1 कोटी चाचण्या दर महिन्याला केल्या जाणार आहेत.  याच पार्श्वभूमीवर देशातील इतर भागासह विकसनशील देशात अशा सुविधा निर्माण करण्यावरही भर दिला जाणार आहे.  

मेगालॅब या महत्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत मुंबई विद्यापीठाच्या नॅनोसायन्स आणि नेनोटेक्नोलॉजी विभाग आणि इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून एकत्रिक काम केले जाणार आहे. याअन्वये आयआयटीचे अल्युमनाय आणि माजी विद्यार्थ्यांच्या संस्था मुंबई विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक माजी विद्यार्थ्यांसह एकत्र काम करणार आहेत.

mumbai to have corona mega lab this lab will help to conduct 1 crore test in a month 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com