
मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे बुधवारी त्यांच्या मूळ गावी अंतरवली सराटी येथून मुंबईला रवाना झाले आहेत. त्यांनी २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांनी पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र आता आझाद मैदानावर आंदोलन करण्यास त्यांना परवानगी देण्यात आली आहे. काही अटींवर त्यांना ही परवानगी देण्यात आली आहे. मात्र मनोज जरांगे आंदोलनासाठी निघताना पत्नी आणि मुलगा मुलींना अश्रू अनावर झाले. जरांगे पाटील यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. यावेळी त्यांच्या मुलीला मुलीला चक्कर आली होती. तरीही जरांगे पाटील पुढे निघाले.