
मुंबई : गणेशोत्सव निर्विघ्न पार पडण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. गणेशोत्सव काळात विविध कारणांनी संवेदनशील असलेल्या वस्त्या, ठिकाणांवर सीसीटीव्ही, ड्रोनद्वारे पोलीस कराडी नजर ठेवली जाईल. अंतर्गत सुरक्षेसह कोणत्याही निमित्ताने शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, गर्दीची संधी साधून गुन्हे घडू नयेत या दृष्टिकोनातून बंदोबस्ताची आखणी केल्याचे पोलीस आयुक्तालयाकडून स्पष्ट करण्यात आले.