
मुंबई : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी दोन दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदान येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन ठोकले आहे. या आंदोलनात राज्यभरातील लाखो आंदोलकांनीही पाठिंबा देत या ठिकाणी हजेरी लावली आहे. दिवसेंदिवस आझाद मैदान येथे मराठ्यांचा ओघ वाढत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान या आंदोलनात अनेक नेत्यांनींही मनोज जरांगे यांची भेट घेत पाठिंबा दर्शवला आहे.