पोलिसांच्या हाती तुरी देत लॉकअपमधून कैदी फरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

मुंबईतील वरळी पोलिसांच्या लॉकअपमधून आरोपी फरार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Prisoner Absconding : पोलिसांच्या हाती तुरी देत लॉकअपमधून कैदी फरार

मुंबई - मुंबईतील वरळी पोलिसांच्या लॉकअपमधून आरोपी फरार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीला नैसर्गिक विधीसाठी नेले असता. शौचालयाच्या खिडकीच्या काचा काढून आरोपीने पळ काढला.काही दिवसांपूर्वीच या आरोपीला वरळीच्या जिजामाता नगर येथे नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले होते.

चौकशीत आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून 7 लाखांची रोकड व सोने चांदीचे दागिनेही हस्तगत केले होते. आरोपी मूळचा गुजरातचा असून त्याच्यावर गुजरातसह नाशिक आणि इतर ठिकाणाही गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.

विशेष म्हणजे हा आरोपी इतका चलाख आहे की जिथे चोरी करतो तिथे मागच्या चोरीतला मोबाइल ठेवतो. तसेच ओळख लपवण्यासाठी हा आरोपी स्वत:जवळ त्याचे कुठलेही कागदपत्र व ओळखपत्रही ठेवत नाही.या आरोपीच्या अटकेनंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन त्याच्याबाबतची माहिती दिली होती.

मात्र अवघ्या काही तासात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन या आरोपीने पळ काढला आहे. या आरोपीच्या शोधासाठी आता वरळी पोलिसांचे पथक चार दिवसांपासून गुजरातमध्ये तळ ठोकून असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.अधिक तपास वरळी पोलिस करत आहेत.