मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 6 कोटींच्या ड्रग्जसह नायजेरियन तरुणाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Police

मुंबई पोलिसांकडून 6 कोटींच्या ड्रग्जसह नायजेरियन तरुणाला अटक

क्रूझ ड्रग पार्टीवर झालेल्या कारवाईनंतर राज्यात सध्या अंमली पदार्थ तस्करांवर यंत्रणांचं लक्ष असल्याचं दिसतं आहे. एनसीबीने केलेल्या कारवाईनंतर आता पोलिसांचे अंमली पदार्थ विरोधी पथक देखील खडबडून जागे झाल्याचे दिसते आहे. त्यातच आज मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एका नायजेरीयन ड्रग्ज तस्कराला ताब्यात घेतलं आहे. या तस्कराकडून पोलिसांनी जवळपास सव्वादोन किलो मेथाक्वालोन (Methaqualone) नावाचा अंमली पदार्थ जप्त केला.

हेही वाचा: "EDने वक्फ बोर्डाच्या 30 हजार संस्थांची चौकशी करावी"

मुंबई पोलिसांनी कारवाई करत अंमली पदार्थ विरोधी पथकाने या व्यक्तीला ताब्यात घेतलं असून, त्यांच्याकडून २.१४ किलो अंमली पदार्थ ताब्यात घेतले आहेत. या अंमली पदार्थाची किंमत जवळपास ६ कोटी रुपये असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. अंमली पदर्थांच्या तस्करांवर पोलिसांची करडी नजर आहे.

हेही वाचा: "EDने वक्फ बोर्डाच्या 30 हजार संस्थांची चौकशी करावी"

आधीही काही गुन्हे दाखल

अटक करण्यात आलेल्या आरोपीवर या आधीही काही गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत. यात मुंबईतल्या घाटकोपर आणि आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये एनडीपीएस कायद्याअंतर्गत प्रत्येकी एक तर नागपुरच्या सोनेगाव पोलिस स्टेशनमध्येही एक फॉरेनर्स अॅक्ट अतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याचा पासपोर्ट मुंबई न्यायालयानं जप्त केलेला आहे.

मेथाक्वॅालोन ड्रग

मेथाक्वालोन ड्रग हे मेंदु आणि मज्जासंस्थेली GABA RECEPTORS चा क्रीया वाढवतं, त्यामुळं रक्तदाब कमी होतो, आणि श्वासाची गती कमी होऊन खोल विश्रांतीची स्थिती तयार होते. 1965 पर्यंत हे ड्रग वेदनाशामक म्हणून वापरलं जात होतं, नंतर ते क्लब ड्रग म्हणू प्रचंड लोकप्रिय झालं. 1970 च्या दशकात डिस्कोच्या लोकप्रियते सोबत हे ड्रग लोपप्रिय झाल्यानं त्याला डिस्को बिस्कीटं म्हणूनही ओळखंलं जातं. त्याचं प्रमाणाबाहेर सेवन केल्यानं मज्जासंस्था बंद पडणे, उलट्या होणं, मुत्रपिंड निकामी होणं तसंच कोमा आणि मृत्युही होऊ शकतो.

loading image
go to top