

Mumbai Police Threatening to Student Protesters
ESakal
मुंबई : देशभरात नीट (NEET) पेपरफुटीप्रकरणी अभिजित दिपके यांनी आंदोलन केल्यांनतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी देखील उपोषण सुरु केले आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह शिक्षण व्यवस्थेत बदल करण्याची युवकांची मागणी आंदोलनातून केली जात आहे. दिल्लीसह अनेक शहरांमधील विद्यार्थी निदर्शनं आणि रॅलींचे आयोजन करत आहेत. मुंबईतही विद्यार्थ्यांकडून आंदोलनं काढली जात असून याप्रकरणी पोलिसांनी थेट विद्यार्थ्यांना धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.