esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

fake call center

मुंबई विमानतळावरील कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका, पोलिसांना फेक कॉल

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : मुंबई विमानतळावरील (mumbai international airport) कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका असल्याचा फोन मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रक (mumbai traffic control police) शाखेला आला. हा फोन लखनौवरून आला असून तो फसवा फोन होता. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून मुंबई पोलिस हे लखनौ पोलिसांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.

हेही वाचा: राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, सात जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई वाहतूक पोलिसांच्या कंट्रोल युनिटला आज सकाळीच एक फोन आला. त्यामध्ये मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जीवाला धोका असल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर मुंबई पोलिसांमध्ये खळबळ निर्माण झाली. मात्र, चौकशी केल्यानंतर हा फोन फसवा असल्याचे समजले. त्यानंतर याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. फोन करणारी व्यक्ती ही लखनौ येथील रहिवासी आहे. त्यामुळे सध्या मुंबई पोलिस हे लखनौ पोलिसांच्या संपर्कात असून लवकरच आरोपीला मुंबईत आणले जाईल, असे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. याबाबत एनआय या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

loading image
go to top