Mumbai Crime : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! एक कोटींपेक्षा अधिक किंमतीचे ड्रग्ज जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Mumbai Crime : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! एक कोटींपेक्षा अधिक किंमतीचे ड्रग्ज जप्त

मुंबई - मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका व्यक्तीकडून १ कोटी ३० लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले असून त्याच्याकडून ३२५.१ ग्रॅम वजनाचे उच्च प्रतीचे हेरॉईन जप्त केले आहे. त्याच्याकडून ४ लाख ६० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. (Crime News news in Marathi)

हेही वाचा: Covid Vaccine : नाकाद्वारे देण्यात येणारी कोविड लस 'यादिवशी' होणार लाँच; दर...

दिंडोशी आणि मुंबईच्या इतर भागात प्रतिबंधित पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. "आम्ही मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्ज जप्त केले होते, ज्याला सामान्यत: एक्स्टसी म्हणून ओळखले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची अंदाजे किंमत २० लाख रुपयांहून अधिक होती. तेव्हापासून आम्ही प्रतिबंधित पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या लोकांचा शोध घेत आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा: Sara Ali Khan Video : सुशांत सिंगच्या जन्मदिनानिमित्त साराचा अनोखा उपक्रम

पोलिसांनी आरोपीला गुरुवारी रात्री अटक केली आणि शुक्रवारी न्यायालयात हजर केले. त्यानंतर त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

मुंबईतील आझाद मैदानात अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एटीएस) एक हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. ही औषधे द्रव स्थितीत चार ड्रममध्ये नेली जात होती. या औषधांची किंमत अंदाजे एक हजार कोटी रुपये होती. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली होती. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे डीसीपी शिवदीप लांडे यांनी सांगितले की, भारतीय बाजारात एक किलो फेंटॅनिल ड्रग्जची किंमत १२ कोटी रुपये आहे. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत सुमारे एक हजार कोटी रुपये आहे.

टॅग्स :Mumbai NewsCrime News