esakal | मुंबईकरांनो 'याठिकाणी' जागोजागी आहे नाकाबंदी, विनाकारण बाहेर पडायचा विचारही करू नका
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईकरांनो 'याठिकाणी' जागोजागी आहे नाकाबंदी, विनाकारण बाहेर पडायचा विचारही करू नका

मुंबईत कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय. काही केल्या मुंबईतील कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी होण्याचं नाव नाहीये.

मुंबईकरांनो 'याठिकाणी' जागोजागी आहे नाकाबंदी, विनाकारण बाहेर पडायचा विचारही करू नका

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - मुंबईत कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय. काही केल्या मुंबईतील कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी होण्याचं नाव नाहीये. सरकारकडून मिशन बिगिन अगेन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना काही शिथिलता देण्यात आली आहे. मुंबईतील उद्योग धंदे आणि ऑफिसेस सुरु करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. याचा परिणाम मुंबईतील वाढत्या रुग्णसंख्येच्या स्वरूपात दिसतोय की काय असा प्रश्न आता निर्माण होतोय. दरम्यान कोरोना परिस्थिती पाहता मुंबईमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जातेय. सोबतच ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, कल्याण डोंबिवली या MMR भागात पोलिसांनी आता कडक तपासणी सुरु केलीये. 

कसं होणार MissionBeginAgain? निम्म्यांहून जास्त मुंबई कंटेन्मेंट झोनमध्ये 

संपूर्ण MMR भागात आता पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात तपासणी करण्यात येत असल्याने काल पेक्षा आज रस्त्यांवर कमी गर्दी पाहायला मिळाली, मात्र ठिकठिकाणच्या नाकेबंदीमुळे काही ठिकाणी ट्राफिक जॅम देखील झालेला पाहायला मिळाला. काल दहिसरमधील भयंकर ट्राफिक जॅम आपण सर्वानीच पहिला. आज दहिसर ऐवजी बोरिवलीत नाकाबंदी केल्यानं पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.   

मुंबईतील कॉलेजचा अजब कारभार, परीक्षा नाही...पण परीक्षा शुल्काची मागणी

मुंबईतील उत्तर भागात म्हणजेच कांदिवली, मालाड, दहिसर, बोरिवली या भागात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढतायत. या पार्श्वभूमीवर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात नाकाबंदी केलीये. दुचाकीवर विनाकारण फिरणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येते. मुंबई पोलिसांकडून तब्ब्ल १६ हजार दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. गाड्या ठेवण्यास मोठी जागा नसल्याने या गाड्या जोगेश्वरीच्या रस्त्यालगत पार्क केल्यात.   

mumbai police taking strict action on people who are roaming unnecessarily on bike