पण दारू पिऊन गाडी चालवायची गरजच काय ?

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 January 2020

इतक्यांदा सांगितलंय तरी पहिले पाढे पंचावन्न.. 

मुंबई :  दरवर्षी ही कारवाई होते, तरीही वर्षागणिक दारू पिऊन गाडी चालवणार्यांची संख्या वाढत चालली आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या 798 मद्यपी चालकांवर मुंबई वाहतुक पोलिसांनी कारवाई केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात वाढ झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकारी दिली.

नववर्षात पूर्वसंध्येला म्हणजेच थर्टीफर्स्टला मुंबईत 163 ठिकाणी तपासणीसाठी पोलीस तैनात करणार आले होते. 1 जानेवारी सकाळ पर्यंत सुमारे 798 चालक मद्यप्राशन करून गाडी चालवत असल्याचा निष्पन्न झाले. त्यात 588 दुचाकी, तर 210 चारचाकी वाहन चालकांचा समावेश आहे.

मोठी बातमी :  'महाराष्ट्रात बेईमान सरकार' - देवेंद्र फडणवीस

गेल्या वर्षी थर्टीफर्स्ट पासून 1 जानेवारी दुपारपर्यंत पोलिसांनी केलेल्या कारवाई 433 मद्यपी चालकांवर कारवाई करण्यात आली होती. याशिवाय भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्या एक हजार 114 चालक व इतर कारवायांमध्ये 9 हजार 121 चालकांवर कारवाई करण्यात आली होती.

  • मुंबईत 798 मद्यपी चालकांवर कारवाई
  • 5338 चालकांची तपासणी करण्यात आली

2017 मध्ये कारवाईमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला 613 तळीराम हे दारू पिऊन वाहन चालवित असल्याचे आढळून होते. तर, 31 डिसेंबर, 2016 ला 565 मद्यपींवर कारवाई करण्यात आली होती. हेल्मेटशिवाय गाडी चालवल्याप्रकारणी 199 दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात आली.

मोठी बातमी : विना-अनुदानित सिलिंडर महागला

तसेच पोलिसांनी नियम तोडणाऱ्या एकूण चार हजारहून अधिक वाहनचालकांवर कारवाई केली. या कारवाईमधून वाहतूक पोलिसांनी सुमारे 4 लाख रुपये दंडही वसूल केला होता. यंदाही पोलिसांनी (Drunk and Drive) ड्रंक अँड ड्राईव्हसोबतच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली आहे.

WebTitle : mumbai police took action on 798 drunk drivers on the eve of new year


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai police took action on 798 drunk drivers on the eve of new year