स्विडनमधून बेपत्ता झालेली मुलगी सापडली मुंबईत; पोलिसांनी लावला शोध

गुन्हे शाखेच्या युनिट 6 नं लावला मुलीचा शोध
missing girl
missing girlsakal media

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : स्विडनमध्ये हरवलेल्या (Girl missing from Sweden) अल्पवयीन मुलीचा शोध मुंबई पोलिसांनी (Mumbai police) लावला आहे. त्या मुलीसाठी इंटरपोलनं यलो नोटीस जारी (Interpol yellow notice) केली होती. मुलगी तिच्या भारतातल्या मित्राला भेटायला आली होती. मुंबई पोलिसांची ख्याती तशी जगभर पसरलेली आहे, मुंबई, भारत आणि आता थेट स्विडनमधून पळून आलेल्या एका मुलीला मुंबई पोलिसांनी शोधून (minor Girl found) तिला कुटुंबियांकडे सुखरु़प परत पाठवली आहे.

missing girl
ठाणे : टोपीवरील 'किंग्स' नावाने केला चोरट्यांचा घात; दुकली अटकेत

नोव्हेंबर महिन्यात स्विडनहून एक अल्पवयीन मुलगी हरवल्याची इंटरपोलची यलो नोटीस मुंबई पोलिसांना मिळाली होती, माहितीचा तपास करताना ती मुलगी तिच्या इन्स्टाग्रामवर असलेल्या भारतीय मित्राला भेटायला मुंबईत आली आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती, त्यावरुन मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 6 चे सहाय्यक पोलीस निरिक्षक मंगलसिंह चव्हाण, सहाय्यक पोलीस निरिक्षक मिरा देशमुख यांच्या टिमनं इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्या मित्राला शोधून काढलं.

त्याची कसून चौकशी केली तेव्हा ती मुलगी मुंबईतल्या ट्रॉम्बे परिसरात रहात असल्याचं समजलं. मिळालेल्या पत्यावरुन पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतलं आणि तिला डोंगरीच़्या बालगृहात ठेवण्यात आलं. मुलगी सापडल्याची माहिती दिल्ली इंटरपोल कार्यालय आणि स्विडन एम्बसीला देण्यात आली. स्विडन एम्बसीनं त्या मुलीच़्या वडीलांना मुलगी मिळ्याची माहिती दिली. त्यानंतर ते भारतात आले त्यांनी त्यांच़्या मुलीला ओळखलं, त्यांची आणि सदर मुलीची सगळी कागदपत्र पोलिसांनी तपासली, आणि त्यांची खात्री झाली की हेच मुलीचे वडील आहेत तेव्हा त़्यांनी मुलीला तिच्या वडीलांकडे सोपवलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com