
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हिंदी गाण्याच्या विंडबनात गद्दार असं म्हटलं होतं. या प्रकरणी शिवसेनेच्या आमदाराने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुंबईत कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल केला होता. मद्रास उच्च न्यायालयाने कुणाल कामराला अटकेपासून संरक्षण दिलं असलं तरी कुणाल कामरा अद्याप पोलिसांसमोर हजर झालेला नाही. खार पोलिसांनी दुसरे समन्स बजावले होते. तरीही तो हजर न झाल्यानं पोलीस त्याच्या मुंबईतील घरी गेले. पण कुणाल कामरा तिथं नव्हता.