
Who is Owner Of The Habitat: मुंबईतील प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडी शो 'द हॅबिटॅट' सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने त्याच्या शोदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिप्पणी केल्याने वाद सुरू झाला. हा व्हिडिओ व्हायरल होताच शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी 'द हॅबिटॅट'ची तोडफोड केली, त्यानंतर मुंबई महापालिकेने (बीएमसी) तेथील बेकायदा बांधकाम पाडण्याची कारवाई सुरू केली.