अंबानींच्या घराचा पत्ता विचारणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात, म्हणाले...

सुरक्षेच्या कारणामुळे मुंबई पोलिसांनी अँटिलिया परीसरातील सुरक्षा वाढवली आहे.
Antilia
AntiliaTeam eSakal

देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाचा पत्ता विचारल्याने एका टॅक्सी चालकाला दोन व्यक्तींवर संशय आला होता. या टॅक्सी चालकाने ही माहिती मुंबई पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांच्या तपास यंत्रणा कामाला लागल्या होत्या. त्यानंतर आज पोलिसांनी या प्रकरणातील त्या दोन संशयितांनी ताब्यात घेतलं आहे.

Antilia
कोश्यारींना मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी संजय राऊत राजभवनावर

पाठीवर मोठ्या बॅग आणि संशयास्पद हालचाली असणाऱ्या दोघांनी काल मुंबईतील अँटेलियाचा पत्ता विचारला होता. त्यानंतर आता पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. टॅक्सीचालकाने केलेल्या वर्णणानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. या दोघांना अँटेलिया बंगला बघायचा असल्याने त्यांनी पत्ता विचारला असल्याचा पोलिसांच्या चौकशीतून समोर आलं आहे. या प्रकरणात दोघांनी ज्या गाडीतून टॅक्सीचालकाला पत्ता विचारला होता त्या कारची देखील पोलिसांनी ओळख पटली आहे. टॅक्सी चालकाने केलेल्या कॉल नंतर पोलिसांनी या गोष्टीची गंभीर दखल घेत अँलिलिया परिसरातील सुरक्षा वाढवली होती.

Antilia
ST STRIKE: सरकारने निवडला खासगी वाहतुकीचा पर्याय

दरम्यान, देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेवर फेब्रुवारीपासूनच कडक पाळत ठेवली जातेय. फेब्रुवारीमध्ये अँटिलिया जवळ एका एसयुव्हीमध्ये स्फोटकांनी भरलेली बॅग आढळल्यापासून मुकेश अंबांनींच्या घराची सुरक्षा वाढवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com