

होळी, रंगपंचमीनिमित्त रस्त्यावरील मद्यपींचा अतिरेक रोखण्यासाठी मुंबई पोलीस शहरात सर्वत्र नाकाबंदी लावून ड्रंक ॲन्ड ड्राइव्हविरोधात विशेष मोहीम हाती घेणार आहेत. याशिवाय गल्लीबोळात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गर्दीची ठिकाणे, दाट आणि मिश्र वस्त्यांवर विशेष लक्ष असेल, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.