मुंबई : वरळीत मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेला डीजेचा गोंगाट थांबवण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकाला धक्काबुक्की, शिवीगाळ आणि नोकरी घालवेन, अशी धमकी देण्यात आली. बुधवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. .याप्रकरणी वरळी पोलिसांनी स्वप्नील सावंत (वय ३७) या तरुणास ताब्यात घेतले. त्याला तपासात सहकार्य करण्याबद्दल नोटीस देत सोडण्यात आले. बीडीडी चाळ ८०, ८१ येथे बुधवारी (ता. १८) हळद समारंभानिमित्त आयोजकांनी डीजे लावला होता. डीजेचा कर्कश गोंगाट मध्यरात्री बारापर्यंत सुरूच राहिल्याने वसाहतीतून पोलिस नियंत्रण कक्षाकडे मदत मागण्यात आली. .कारवाईसाठी आलेल्या वरळी पोलिस ठाण्याच्या पथकाला आरोपी सावंत याने अडवले. पथकाला सर्वांसमक्ष अर्वाच्च शिवीगाळ करत धमकावले, धक्काबुक्की केली. पथकाने आरोपीला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. प्रवासादरम्यान आणि पोलिस ठाण्यातही त्याने ही कृती सुरू ठेवली. त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.