"स्वतःचे दामन रक्ताने लादले असणाऱ्यांनी दुसऱ्यांवर आरोप करूच नये"आशिष शेलार यांचे राऊत पवारांवर थेट आरोप

सुमित बागुल
Wednesday, 27 January 2021

ज्यांचे स्वतःचे दामन रक्ताने लादलेलं आहेत त्यांनी दुसऱ्यावर आरोप करू नये

मुंबई : भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. काल दिल्लीत झालेल्या हिंसक शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर कडाडून टीका केली. संजय राऊत आणि शरद पवार यांच्यावर देखील आशिष शेलार यांनी शरसंधान साधलं 

तुमची तोंडे आज का शिवली

रोज वचवाच करणारे संजय राऊत यांनी आज जवान आणि देशातील पोलिसांच्या बाजूने का बोलले नाहीत हे स्पष्ट करावं. कधीकधी आवश्यकता असल्यास फेसबुक पोस्ट टाकणारे शरद पवार साहेब तुमची फेसबुक पोस्ट जवान आणि पोलिसांच्या बाजूने का आली नाही ?  या सगळ्या आंदोलनात जो वावर आणि वास हा अन्य लोकांचा चालू आहे त्याचे समर्थक शरद पवार तुम्ही आणि संजय राऊत तुम्ही स्वतः आहात. म्हणून तुमची तोंडे आज का शिवली आहेत? असा प्रश्न आम्ही तुम्हाला देशवासीयांच्या वतीने आम्ही विचारात आहोत, असा आशिष शेलार म्हणालेत. 

महत्त्वाची बातमी : कुणाला काय वाटेल याची पर्वा न करता जेंव्हा शिवसेनेचा खासदार भाजप आमदाराने आयोजित कार्यक्रमात लावतो थेट हजेरी

देशवासी यांना सोडणार नाहीत

स्थिती अस्थिर करून स्वतःचा अजेंडा राबवायचा आहे असा आदित्य ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर आशिष शेलार यांनी उत्तर दिले. शेलार म्हणालेत की, "केंद्र सरकारने २०१४ पासून २०२० पर्यंत जनहिताचा निर्णय घेतला. लॉन्ग मार्च ते लॉन्ग आंदोलन, पुरस्कार वापसी ते पुरस्कार वापसीचे समर्थन ही भूमिका देशातील शहरी नक्षलवादी आणि विशेषतः मोदी विरोधकांनी घेतली आहे. आम्ही पाहिलं आहे की, फिल्म इस्टिट्यूटचा डायरेक्टर कोण नेमला.. दिवसेंदिवस आंदोलन.. JNU मध्ये कुणाची बर्सी साजरी केली जाते, त्याला विरोध केला तर दिवसेंदिवसांच आंदोलन. CAA  च्या कायद्यातून देशात नागरिकांना अभय मागणार्यांना अभय दिलंतर त्याच्यावर रस्ते बंद करून आंदोलन. केवळ राजकीय सुडापोटी आणि मोदी द्वेषापोटी या देशात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि दुर्दैवाने शिवसेना अराजकता आणू पाहतेय, त्यासाठी देशवासी यांना सोडणार नाहीत. 

महत्त्वाची बातमी : मुंबई लोकलबाबत महत्त्वाची बातमी; मध्य आणि पश्चिम रेल्वेने घेतला महत्त्वाचा निर्णय

सगळ्यांनी परामोच्च कोटींचा संयम दाखवला

जवान असो वा दिल्ली पोलिस, या सगळ्यांनी परामोच्च कोटीचा संयम दाखवला, तो त्यांच्या पराकोटीच्या देशभक्तीचा परिचय होता. केंद्र सरकार ज्या पद्धतीने आंदोलनास ज्या पद्धतीने संयमाने सामोरं गेलं. त्यानंतर विरोधकांना गोळीबार हवा होता का ? म्हणून माथी भडकवायचं काम शरद पवार यांच्याकडून अपेक्षित नाही. कोर्टासमोर केसेस आहेत, सुप्रीम कोर्टाचं आम्ही ऐकणार नाही, सुप्रीम कोर्टाच्या समितीसोबत जाणार नाही, बोलणार नाही अशी आंदोलकांची भूमिका आहे. तासंतास आणि दिवसेंदिवस कृषी मंत्री अतिशय नम्रतेने चर्चा करू असा म्हणतात ते कशाचं द्योतक आहे.

महत्त्वाची बातमी : तीराला एक इंजेक्शन द्यायचं आहे, ज्याची किंमत तब्बल १६ कोटी रुपये आहे

संयमाची भाषा शिवसेना आणि राष्ट्रवादीने करूच नये

त्यामुळे संयमाची भाषा शिवसेना आणि राष्ट्रवादीने करूच नये. माथेफिरूंचं समर्थन करू नये. पोलिसांनी याबाबत चौकशी करून जो दोषी असेलत्याला पकडावं आणि त्यांच्या समर्थकांपर्यंत देखील पोहोचावं अशी आमची मागणी आहे. ज्यांचे स्वतःचे दामन रक्ताने लादले आहेत त्यांनी दुसऱ्यावर आरोप करू नये. जे सत्य आहे ते देशाने पाहिलं. बाकीचं सत्य चौकशीनंतर समोर येईल. 

पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालणं, पोलिसांवर लाठ्या उचलणं, त्यांना लाथा बुक्क्यांनी मारणे, तलवारी काढणे  हे कोणत्या देशभक्तीत बसतंय ते पाहावं आणि याचे उत्तर शरद पवार आणि संजय राऊतांनी द्यावं.  या आंदोलनाला ज्यांनी तीव्र रूप दिलं त्यांची चौकशी तर होईलच मात्र ज्यांनी याचे समर्थन केलं त्यांची देशील चौकशी केली जावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी दिली आहे.

mumbai political news BJP leader Ashish shelar targets sanjay raut and sharad pawar of shivsena 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai political news BJP leader Ashish shelar targets sanjay raut and sharad pawar of shivsena and NCP