
येत्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काही ठरतंय का असा प्रश्न विचारण्याची आता वेळ आली आहे
मुंबई : येत्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काही ठरतंय का असा प्रश्न विचारण्याची आता वेळ आली आहे. कारण विधानसभेच्या निवडणुकांनंतर भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जवळीक वाढताना पाहायला मिळालीये.
समान विचारांच्या शिवसेनेपासून वेगळं झाल्यानंतर भाजप आणि मनसे एकमेकांसोबत राहून राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली हिंदुत्त्ववादी पक्षाची पोकळी भरून काढण्याचे प्रयत्न होणार असं राजकीय विश्लेषक म्हणतायत.
महत्त्वाची बातमी : काय, कोरोना लसीमुळे नपुंसकत्व येते, नजर देखील जाते ?
आज या चर्चांना पुन्हा उधाण आलं ते म्हणजे आज भारतीय जनता पक्षाचे नेते प्रसाद लाड यांनी महाराष्ट्र नानिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर झालेली भेट. या भेटीनंतर प्रसाद लाड यांनी माध्यमांना माहिती देखील दिली.
माध्यमांशी बोलताना प्रसाद लाड म्हणालेत की, "माझी आणि राज ठाकरेंची झालेली भेट ही वैयक्तिक भेट होती. मी राज ठाकरे यांना हाताला लागण्याने त्यांना पाहायला तब्बेतीची विचारपूस करण्यास आलो होतो.
महत्त्वाची बातमी : याच महिन्यात ठाणे जिल्ह्यातील शाळा सुरु होणार, एकनाथ शिंदेनी सांगितली तारीख
दरम्यान, येत्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि मनसे एकत्र येणार का हे देखील प्रसाद लाड यांना विचारण्यात आलं. ज्यावर प्रसाद लाड यांनी अतिशय सूचक व्यक्तव्य केलं आहे. मुंबई महानगर पालिकेत आम्ही भाजपचा झेंडा फडकावणारच आणि त्यासाठी जे जे लोकं आमच्या सोबत येतील त्यांना आम्ही सोबत घेणार असं सूचक प्रसाद लाड यांनी केलं आहे. योग्य वेळी तुम्हाला उत्तर मिळेल असंही प्रसाद लाड म्हणालेत.
mumbai political news bjp leader met mns chief raj thackeray at krushnakunja