याच महिन्यात ठाणे जिल्ह्यातील शाळा सुरु होणार, एकनाथ शिंदेनी सांगितली तारीख

सुमित बागुल
Saturday, 23 January 2021

दिवाळीनंतर वाढलेली कोरोना रुग्णसंख्या आणि परदेशात आलेला कोरोनाचा नवीन स्ट्रेन यामुळे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील शाळा सुरु करण्यात आल्या नाही.

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील शाळांबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय. कारण लवकरच ठाणे जिल्ह्यातील शाळा सुरु होणार आहेत. स्वतः ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शाळा सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खरंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील शाळा गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत. अशात आता ठाण्यातील सर्व माध्यमांच्या शाळा तसेच आश्रमशाळा येत्या २७ जानेवारीपासून सुरु होणार आहेत. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तसे आदेश दिले आहेत. 

महत्त्वाची बातमी : मुंबईची हवा पडली 'आजारी'; कशामुळे होतेय मुंबईची हवा इतकी विषारी ?

एकनाथ शिंदे यांनी शाळा सुरु करण्याचे आदेश जरी दिले असले तरीही ठाण्यातील शहरी भागातील शाळा खुल्या होणार नाहीत. कारण ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरी भागांमध्ये हे आदेश लागू होणार नाहीत. ठाणे जिल्ह्यातील शहरी भागांमधील शाळा सुरु करण्यासाठी वेगळी नियमावली जाहीर केली जाणार आहे. ही नियमावली आल्यानंतरच ठाणे जिल्ह्यातील शहरी भागातील शाळा सुरु होणार आहेत.

महत्त्वाची बातमी :  2 किलो 700 ग्रामचं गोल्डन घबाड हवाईमार्गे आलं मुंबईत आणि तरन्नुम खान, विशाल ओबेरॉय गेले थेट जेलमध्ये

खरंतर, याआधी डिसेंबरमध्ये शाळा खुल्या केल्या जाणार होत्या. मात्र दिवाळीनंतर वाढलेली कोरोना रुग्णसंख्या आणि परदेशात आलेला कोरोनाचा नवीन स्ट्रेन यामुळे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील शाळा सुरु करण्यात आल्या नाही. आता कोरोनाचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होतोय. या पार्श्वभूमीवर आता शाळा सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्यात. 

schools of thane district rural area to start from 27th january orders by guardian minister eknath shinde

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: schools of thane district rural area to start from 27th january orders by guardian minister eknath shinde